एक कविता - अनुवादित
काल परवाच मुलाला एक इंग्लिश पुस्तक वाचून दाखवत होतो . फार मजेशीर गोष्ट होती इंग्रजी मध्ये ..वाचल्या नंतर त्या गोष्टीची केलेली कविता मराठीत अनुवादीत
माकडाच्या पिल्लाची हरवली आई
कुठे शोधू तिला, त्याला समजल नाही
उगी उगी बाळा नको असे रडू
शोधू तिला आपण बोले फुलपाखरू
कशी आहे आई तुझी
सांग जरा मला
शोधू तिला दोघे आपण
धीर धर थोडा
तशी आहे माझी आई
माझ्यापेक्षा मोठी
दिसत नाही कुठे तीही
नाव तिचे ओठी
तुझ्या पेक्षा मोठी ?
मग तर शोधायचीच खोटी
आहे माहित मला
तू चल तर खरा
नाही नाही फुलपाखरा
हा तर आहे हत्ती
नाही माझी आई
एवढी धट्टी कट्टी
नाही तिला सोंड
ना खांबा सारखे पाय
लांब आहे शेपूट तिची
झाडावर चढत जाय
लांब शेपूट उडे ?
चल मग पटकन पुढे
नको पाहू तिकडे
आहे ती इकडे
बाप रे बाप हा तर आहे साप
सरपटत जाय अन नाही याला पाय
फणा काढतो फुसकन
आई मात्र माझी उडी मारते धपकन
पाय असेलेला प्राणी
माझ्या लक्षात कोणी
आहे एक तिकडे
ये जरा इकडे
अरे रे रे रे रे रे हा तर आहे कोळी
दिवसभर नुसता विणत बसतो जाळी
खातो नुसता माश्या आणि किडे
आईला माझ्या तर आवडतात फळे
झाडावर का राहते तुझी आई ?
हे तर मला तू सांगितलेच नाही
वर बघ पटकन
दिसेल आई झटकन
हा तर हिरवा पोपट
याची चोच लाल लाल
पंखाविना आई माझी
मारते उड्या लांब लांब
अरेच्या एवढाच ना
तळ्याकाठी बघ ना
ती पहा तुझी आई
काठावर बसलीये ना
हिरवा हिरवा शेवाळी
हा तर बेडूक डराव डराव
माझी आई तपकिरी
घेते मला कुशीत उबदार
उबदार अन तपकिरी ?
बोलला नाहीस मला
चल वर झाडावर
शोधू आपण तिला
उलटे लटके झाडाला
हे तर आहे वटवाघूळ
नाही पंख आईला
सांगितलं मी तुला
नको होऊस बाळा
दुःखी आणि कष्टी
जाऊ आपण नदी काठी
शोधू सारी सृष्टी
नाही नाही फुलपाखरा
तुला समजतच नाही
हा तर पुन्हा तोच
मोठ्ठा धिप्पाड हत्ती
कसे न कळे तुला
हे प्राणी पक्षी
माझ्या सारखे कोणी
मुळी दिसतच नाही.
मला ठाऊक नसे
आई तुझ्या सारखीच दिसे
कळेल मला कसे
नाही म्हणालास तू तसे
नाही म्हणालो मी तसे
मला वाटले तुला ठाऊक असे
आई ना माझी, माझ्या सारखीच दिसे
माझ्या पेक्षा उंच आणि थोडी मोठी असे
मला कसे ठाऊक
फुलपाखरू म्हणे
माझी छोटी छोटी सुरवंटी पिले
माझ्या सारखी कधी दिसतच नसे
काळजी नको करू
फुलपाखरू म्हणे
कुठे लपेल तुझी आई
अरे ते पहा तिथे
नाही नाही नाही
हे तर माझे वडील
गेली कुठे माझी आई
कोण शोधून काढील
माकड म्हणे त्याला येरे माझ्या पिला
वेळ झाली आता चल जाऊया घरा
दिवस सारा ढळून जाई
वाट पहाते रे ती पहा तुझी आई
कुठे शोधू तिला, त्याला समजल नाही
उगी उगी बाळा नको असे रडू
शोधू तिला आपण बोले फुलपाखरू
कशी आहे आई तुझी
सांग जरा मला
शोधू तिला दोघे आपण
धीर धर थोडा
तशी आहे माझी आई
माझ्यापेक्षा मोठी
दिसत नाही कुठे तीही
नाव तिचे ओठी
तुझ्या पेक्षा मोठी ?
मग तर शोधायचीच खोटी
आहे माहित मला
तू चल तर खरा
नाही नाही फुलपाखरा
हा तर आहे हत्ती
नाही माझी आई
एवढी धट्टी कट्टी
नाही तिला सोंड
ना खांबा सारखे पाय
लांब आहे शेपूट तिची
झाडावर चढत जाय
लांब शेपूट उडे ?
चल मग पटकन पुढे
नको पाहू तिकडे
आहे ती इकडे
बाप रे बाप हा तर आहे साप
सरपटत जाय अन नाही याला पाय
फणा काढतो फुसकन
आई मात्र माझी उडी मारते धपकन
पाय असेलेला प्राणी
माझ्या लक्षात कोणी
आहे एक तिकडे
ये जरा इकडे
अरे रे रे रे रे रे हा तर आहे कोळी
दिवसभर नुसता विणत बसतो जाळी
खातो नुसता माश्या आणि किडे
आईला माझ्या तर आवडतात फळे
झाडावर का राहते तुझी आई ?
हे तर मला तू सांगितलेच नाही
वर बघ पटकन
दिसेल आई झटकन
हा तर हिरवा पोपट
याची चोच लाल लाल
पंखाविना आई माझी
मारते उड्या लांब लांब
अरेच्या एवढाच ना
तळ्याकाठी बघ ना
ती पहा तुझी आई
काठावर बसलीये ना
हिरवा हिरवा शेवाळी
हा तर बेडूक डराव डराव
माझी आई तपकिरी
घेते मला कुशीत उबदार
उबदार अन तपकिरी ?
बोलला नाहीस मला
चल वर झाडावर
शोधू आपण तिला
उलटे लटके झाडाला
हे तर आहे वटवाघूळ
नाही पंख आईला
सांगितलं मी तुला
नको होऊस बाळा
दुःखी आणि कष्टी
जाऊ आपण नदी काठी
शोधू सारी सृष्टी
नाही नाही फुलपाखरा
तुला समजतच नाही
हा तर पुन्हा तोच
मोठ्ठा धिप्पाड हत्ती
कसे न कळे तुला
हे प्राणी पक्षी
माझ्या सारखे कोणी
मुळी दिसतच नाही.
मला ठाऊक नसे
आई तुझ्या सारखीच दिसे
कळेल मला कसे
नाही म्हणालास तू तसे
नाही म्हणालो मी तसे
मला वाटले तुला ठाऊक असे
आई ना माझी, माझ्या सारखीच दिसे
माझ्या पेक्षा उंच आणि थोडी मोठी असे
मला कसे ठाऊक
फुलपाखरू म्हणे
माझी छोटी छोटी सुरवंटी पिले
माझ्या सारखी कधी दिसतच नसे
काळजी नको करू
फुलपाखरू म्हणे
कुठे लपेल तुझी आई
अरे ते पहा तिथे
नाही नाही नाही
हे तर माझे वडील
गेली कुठे माझी आई
कोण शोधून काढील
माकड म्हणे त्याला येरे माझ्या पिला
वेळ झाली आता चल जाऊया घरा
दिवस सारा ढळून जाई
वाट पहाते रे ती पहा तुझी आई
No comments:
Post a Comment