सकाळी जाग आली… विकेंड असला तरी घड्याळ न बघता ओळखलं सहा वाजलेत… रोजची सवयच ती… बाहेर अंधारच होता … आकाशात ढग नसल्याने कदाचित आज It was a bright and sunny day in England अशा वाक्याने सुरु होणाऱ्या गोष्टी प्रमाणे आजचा दिवशी सूर्य दर्शन होणार या आनंदात बाजूला पाहिलन … गृहलक्ष्मी, कुलदीपक आणि कुलदीपिका निवांत पणे पसरले होते.
आपण सकाळी उठलोय आणि आपल सर्व कुटुंब झोपलंय …अस दिवस म्हणजे सुखाची परिसीमा नाहीतर असा स्वतः साठी वेळ मिळणार तरी कधी ? त्यात दिवटी आणि टेंभा जागे झाल्यानंतर जे घर डोक्यावर घेतात काही विचारयला नको. तसा बायकोचा काही त्रास नसतो म्हणा…(त्रास असतो असं म्हणायची माझी काय बिशाद…तशी पुसटशी देखील शंका आली तर तिथेच मांडी घालून बसून महाचर्चेला सुरुवत. आणि मग office च्या कामाच्या tension मुळे किंवा चुकून माकून मी असे म्हणून गेलो… मला तसे म्हणायचे नव्हते असे गोड बोलून सुटका करून घ्यावी लागते. ) प्रभाते Mobile दर्शनम या श्लोकाप्रमाणे 'What's App' पहिले अपेक्षेप्रमाणे काहीही messages नव्हते. कारण आमच्या टोळभैरावातले सर्व मित्र आज वीकांत असल्याने कुटुंबवत्सल सदगृहस्थ किवा घरगडी झाले असणार त्यामुळे आता 'What's App' थेट सोमवारी … तरीही कोणी मित्र कट्ट्यावर जमलेच किंवा कुठेतरी चौखूर उधळलेच तर एखादा फोटो किंवा मेसेज आलाच तर येतो अन्यथा ग्रूप थंडच सोमवार पर्यन्त.
चहा करावा मस्त आणि 'शंकर' च मन मंदिरा ऐकत आस्वाद घ्यावा म्हणून स्वयंपाक घरात घुसलो… आताशा नुसतंच उजाडलं नव्हतं तर कोवळ्या उन्हाने गवतावरचं दवही चमकत होतं. आल्याच्या चहाच आधण उकळत होता आणि मन मंदिराचे स्वर कानात घुमत होते. मन कसं प्रफुल्लीत झालं होतं … थोड्याच वेळात बायको उठेलच… मग गरमागरम चहा आणि बिस्किटे समोर आल्यावर स्वारी एकदम खूष होइल असा विचार मनात येतो तोच सौ चा mobile चा गजर वाजला…मी मनाशी म्हणालो म्हणजे अजून अर्धातास आहे माझ्याकडे … तो पर्यंत मुलांसाठी breakfast रेडी करावा…
त्याचं काय आहे … बायकोचं आणि घड्याळाचं एक वेगळाच गणित आहे… सहा वाजता उठायच असेल तर पावणेसहाचा गजर लावायचा … तो वाजला की बंद करून पंधरा मिनिट लोळत पडायचं … मग प्रभाते Mobile दर्शनम… आणि मग त्यानंतर उठाण्याचं टायमिंग हे 'What's App' वर आलेल्या मेसेजेस ची संख्या, त्यावर द्यायच्या प्रतिक्रिया … एखादी मैत्रीण online असलीच तर काही मिनिटे आजू जास्त… यावर अवलंबून असते. त्यासाठी काळ, काम, वेग किंवा संख्या शास्त्र यातलं कोणत ही सूत्र कामी येत नाही. त्यात वीकेंड असल्यामुळे ( पाहुणे आल्यावर आमटी ला तवंग यायला दोन चमचे तेल जसे जास्त सोडतात तसे ) अजून काही सेकंद (?) जास्तच. त्यामुळे मी आपला अंदाजपंचे अर्धातास धरून चालतो…
त्यात तिचे प्राथमिक शाळेचा एक ग्रूप, कॉलेज च्या मित्र मैत्रिणींचा एक ग्रूप, कॉलेज च्या फक्त मैत्रिणींचा एक ग्रूप असे अनेक ग्रूप आणि त्यावर चाललेय महा-चर्चा किंवा काहीतरी टुकार कोडी 'खालील चित्रात किती चौकोन आहेत ते ओळखा पाहू' किंवा नवीन सुचलेल्या कविता …त्यावर केवलप्रयोगी अव्ययांचा होणारा भडीमार … आणि पौर्णिमेला जशी समुद्राला भरती येते तशी आज वीकेंड असल्याने मेसेजेस ची उधाणाची भरती आलेली असणार.
तेवढ्यात जिन्यातून चाहूल लागली बघतो तर काय दिवटी आणि टेंभा कुठलीही फुरफुर न करता शांतपणे खाली येउन hall मध्ये खेळत बसली… तोपर्यंत मी चहा, बिस्किटे आणि फ्रेंच टोस्ट घेऊन डायनिंग टेबलाकडे प्रयाण केले. तोपर्यंत बत्तीशीची चौसष्टी करीत बायको आलीच . वाफाळत्या चहाचा कप तिच्या हातात देत, " आज मी बल्लवाचार्य आहे आणि मी आज स्वयंपाक करणार आहे. " अपेक्षे प्रमाणे बायको खूष … आणि मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून " अरे वा , आज कि नाही पप्पा छान उकडीचे मोदक, सुरळीवड्या आणि भरली वांगी असा बेत करणार आहेत. " असा वार केलाच … "स्वयंपाकाला पाककौशल्य वैगेरे म्हणायची काय गरज आहे...किती सोप्पं असतं ते…" ह्या माझ्या त्रिकालाबाधित सत्य वाक्यावर केलेला प्रतिघात होता तो. रोज रोज पोळीभाजी खाऊन कंटाळा आल्यावर शनिवारी रविवारी काहीतरी नवी करावे असा माझा विचार असतो. त्यात नाव नवीन पदार्थ खाण्याची मला आवड असल्यामुळे मी कुठेही holidays ला गेलो तरी Indian Restaurant शोधत बसत नाही. परंतु बायको खाण्याच्या बाबतीत चोखंदळ (घरगुती (हे स्वगत)) असल्याने तिला मात्र भारतीय पदार्थ पसंतीस उतरतात आणि त्यामुळे आमची holiday destinations भारतीय restaurant जवळपास नसेल तर reject होतात.
असो आज 'शिजल रं' चा बेत ठरवून टाकला… (उगाच नाही बार्बेक्यू नेशन ला वीकेंडला रांगा लागत) 'शिजल रं' ही आपल्या मातीत जन्मलेली पाककृती आहे आणि साहेबांनी तिचा Sizzler नामकरण करून जगप्रसिद्ध केलं आणि असे माझ्या वैयक्तिक पाककौशल्य संशोधनातून सिद्ध झाले आहे …
पडत्या फळाची आज्ञा समजून आणि आयते जेवायला मिळणार यामुळे बायकोने फार आढेवेढे न घेत माझ्या पाकक्रियेस (तिच्या भाषेत "घाला काय गोंधळ घालायचाय तो….मला काहीही चालेल…." ) अनुमोदन दिले. आणि स्वयंपाक घराचा भटारखाना होणार याची मनाशी पक्की खात्री बाळगत, पायात बूट अडकवून बाहेरच्या कोवळ्या सूर्य प्रकाशात फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडली.
इकडे मी तेल मसाल्याचे उटणे लावून marination करून गरम oven मध्ये टाकला आणि timer सेट करून वात पाहू लागलो. काय अवघड आहे स्वयंपाक करण्यात? फक्त आवड हवी… कुकरी (Cookery ) हे दुधारी शस्त्र आहे साधला तर फर्मास नाहीतर आहे करपलेला भात…पूर्वी कुकण्यात बायका आघाडीवर होत्या आजकालच्या जमान्यात स्त्रियांच्या हाताला हात लावत पुरुष पण कुकण्यात आघाडीवर आहेत … (टीप : पाककृती , कौशल्य , हे जसे संस्कृत मधून मराठी भाषेत आलेले शब्द आहेत तसाच कुकणे हा आङ्ग्ल भाषेतून जसाच्या तसा मराठीत आलेला शब्द आहे … कानाला सवय करून घ्या ) देश विदेश भाषा आणि प्रदेश जसे बदलतात खाद्य संस्कृतीही बदलते. मला वाटतं पाककौशल्य जे काय म्हणतात ते फारस अवघड नसाव नाहीच। पण काही पदार्थांना एक हाताची चव असते ती मात्र दुसरं कोणीच घडवू शकत नाही . माझ्या आजीच्या हातची कारल्याची भाजी जगातली सगळ्यात उत्तम चवीची होती… त्यात गूळ किती घालायचा तिखट किती घालायचं आणि सकाळी लवकर भाजी करून मुरवत कशी ठेवायची आणि वाढताना किती गरम करायची याचं जे काही कौशल्य ते खरा पाककौशल्य … गूळ कमी पडला तर कडू लागते … जास्त पडला तर गुळमट… मुरली नाही तर सुरुवातीला गोड आणि नंतर कडू लागते… 'चवीपुरतं' तिखट मीठ घालून मुरलेली आजीच्या हातची कारल्याची भाजी गोड, तिखट कडू , तुरट या चवींचा अभूतपूर्व संगम त्या लुसलुशीत पण गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्लेल्या घासला स्वर्गीय चव असते… ती चव tea spoon , table spoon च्या मोजमापात नक्कीच हरवून जाईल… आजी गेली आणि तिच्या हातच्या कार्ल्याच्या भाजीला आम्ही सगळेच पारखे झालो.
इतक्यात oven चा timer आरवला 'शीजल रं ' आणि मी भानावर आलो. एव्हाना बायकोपण उन्हात फेरफटका मारून जेवायच्या वेळेत परत आलो होती… आणि पाहिल्याच घासला डोळे मिटून 'व्वा सुरेख !' अशी दाद तिच्या तोंडून ऐकली आणि मी भरून पावलो …

1 comment:
मस्तच!
एकाच रविवारचे २ views वाचायला मिळाले!
Post a Comment