साहित्य: २ अंडी,१ वाटी गव्हाचे पीठ,मीठ, अर्धा कप दूध, २ ते ३ प्रकारचे जॅम, थोडे तेल.
कृती: प्रथम एका पातेल्यात अंडी फ़ोडून चांगली फ़ेटून घ्यावीत. त्यात नंतर थोडे थोडे गव्हाचे पीठ घालत गुठळ्या मोडत फ़ेटत रहावे. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालावे. नंतर दूध घालून पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करावे.आता गरम तव्यात तेल घालून त्यावर धिरडं घालतात त्या प्रमाणे पीठ घालावे. काळजी नसावी सुंदर पोळीसारखा पॅनकेक आकार घेऊ लागेल. दोन्हीबाजूने भाजून घ्या. पोळीसारखा जास्त खरपूस भाजू नये.आता या पॅनकेक वर तुमच्या आवडीचा जॅम लावा. छान पुंगळी करून ( मराठीत ज्याला रोल म्हणतात ) कपभर दुधाबरोबर सर्व्ह करा. गोड खाणाऱयांना हा पदार्थ विशेष आवडतो.

No comments:
Post a Comment